प्रशाले विषयी

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने १९३९ साली मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. १८८४ पासून संस्थेकडे नाममात्र भाडयानी असलेला होळकर वाडा कै. यशवंतराव महाराज होळकर यांनी संस्थेस दान दिला आणि पंचवीस हजार रुपयांची देणगीही दिली, त्याबदद्ल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'न्यू इंग्लीश स्कूल फॉर गर्ल्स' हे नाव बदलून १९४४ साली 'अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स' हे नवे नमाभिधान करण्यात आले. सुरुवातीला शाळेच्या पटावर २६३ विद्यार्थिनी असून ८ वर्ग सुरू करण्यात आले. त्या नंतर शाळेला मिळत गेलेल्या उत्तम प्रतिसादामुळे वर्गांचा विस्तार करण्यात आला.

१९६१ साली पानशेत धरण फुटले आणि त्यामध्ये दुर्दैवाने या शाळेचे अपरिमित नुकसान झाले. या संकटावर यशस्वीपणे मत करून शाळेने आपली प्रगती चालूच ठेवली. मुलींचा सर्वांगीण विकास करणारी एक नामवंत प्रशाला म्हणून या शाळेने लौकिक मिळवला असून तो सातत्याने टिकविला आहे.