सोयी सुविधा

अत्याधुनिक व्यायामशाळा ग्रंथालय, म्युझिक हॉल, मुक्तांगण हॉल, स्वतंत्र बस व्यवस्था, तळमजला अधिक तीन मजले असलेली नवीन इमारत शिवाय मूळची तळमजला अधिक एक मजला असलेली इमारत आणि प्रशस्त हॉल व त्यावर दोन मजले. १९९५ पासून संगणक हा विषय शाळेत सुरू करण्यात आला असून १४७८ विद्यार्थिनी या वर्गाचा लाभ घेतात. शासनाच्या अभ्यासक्रमाबरोबरच इंटरनेट, वेब पेज डिज़ाइनिंग, व्हिज्युअल बेसिक ही भाषा अशा महत्वाच्या सुविधाही शाळेत उपलब्ध आहेत. बचत शाळा हा किताब पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम या शाळेनेच मिळविला. शाळेचा पालक-शिक्षक संघ सक्रिय असून शाळेच्या विकास कामात त्यांची नेहमीच मदत होते.