प्रशाले विषयी

' मराठी विद्योतेजक मंडळी ', वाई, यांनी न्यू इंग्लीश स्कूल या नावाने १ सप्टेंबर १८८५ मध्ये स्थापन केलेली आणि १८ मे १९१२ रोजी द्रविड हायस्कूल वाई असे नामाभिदान प्राप्त झालेली ही शाळा १९३३ साली डेक्कन एजुकेशन सोसायटीकडे वर्ग करण्यात आली. पुण्यातील सामजिक सुधारणांचा प्रभाव व परिणाम तत्कालीन वाईवर होता व त्याची परिणीती म्हणजे ही शाळा होय. सुमारे ६ एकर परिसरात ही शाळा असून इयत्ता ५ वी ते १० वी चे अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशी शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.