सोयी सुविधा
विस्तीर्ण क्रीडांगण, मोठ्या आकाराच्या सुमारे ३५ वर्गखोल्या असणारी दुमजली दगडी आयताकारात इमारत आहे. प्रशालेचे शिल्पकार व दीर्घकाळ मुख्याध्यापक असलेल्या कै. गुरुवर्य ढवळीकर यांच्या नावाने माजी विद्यार्थ्यानी बांधून दिलेले एक सभागृह आहे. संगणक प्रशिक्षणाची स्वतंत्र सुविधा विद्यार्थ्याना उपलब्ध आहे.
मोठ्या प्रयोगशाळा, ग्रंथालय, अलीकडील काळात बांधलेली मोठी स्वच्छतागृहे, पिण्याची स्वतंत्र सोय असून शाळेच्या संपूर्ण परिसरास संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.
