मुख्यपृष्ठ
विलिंगड्न महाविध्यालयाच्या परिसरात उच्च शिक्षण देणार्या नामवंत संस्था निर्माण झाल्या तरी पायाभूत असलेली पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणारी संस्था स्थापन झालेली नव्हती. ही उणीव लक्षात घेऊन अशी संस्था स्थापन करण्याचा निर्णय संस्थेच्या अधिकार मंडळाने घेतला. आणि विलिंग्डन महाविध्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रकल्प म्हणून अशी संस्था काढण्याचे ठरविण्यात आले.
