सोयी सुविधा
प्रशालेसाठी एकूण रुपये एक कोटी किमतीची अष्टकोनी वास्तू एकूण ८ टप्प्यात पूर्ण करत आणलेली आहे. या इमारतीमध्ये प्रशस्त वर्गखोल्या, उत्तम प्रयोगशाळा, समृध्द ग्रंथालय आणि सभागृह, टॉयलेट ब्लॉक्स, संगणक प्रयोगशाळा, स्वतंत्र सायकल स्टॅंड, प्रशस्त क्रीडांगण अशा सुविधा उपलब्ध आहेत. आणि याच इमारतीचा अखेरचा टप्पा म्हणून अंदाजे ५७ लाख रुपये खर्चाचे भव्य सभागृहाचे बांधकाम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. हे सभागृह प्रशालेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरले जाणार आहेच, पण त्याचबरोबर या सभागृहामध्ये सर्व तर्हेच्या आवश्यक सुविधा असल्यामुळे विश्रामबाग परिसरात अन्य सामाजिक व व्यावसायिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठीसुध्दा उपलब्ध होऊ शकेल.
