प्रशाले विषयी
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने न्यू प्री प्रायमरी ही शाळा १० जून १९८५ ला न्यू इंग्लीश स्कूल टिळक रोडच्या प्रांगणात वीनाअनुदानीत तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमवेत सुरू केली. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनचे वर्ग असल्याने या प्रशालेला, पूरक प्राथमिक विद्यालय असे तिचे सुरुवातीचे स्वरुप अभिप्रेत होते. पण यथावकाश आपल्या गुणवत्तेतून आणि पालकांच्या मोठ्या प्रतिसादातून व मागणीतून ही शाळा आता स्वतंत्र आणि संपूर्ण शाळा म्हणून प्रस्थापित झाली असून तिने नावलौकिक मिळविला आहे.
या शाळेचे नामकरण गोळवलकर गुरुजींच्या शताब्दी वर्षामध्ये त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याच्या हेतूने 'माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय' असे करण्यात आले.
