प्रशाले विषयी

नाना वाड्याच्या भव्य इमारतीत १९०९ पासून न्यू इंग्लीश स्कूलचे वर्ग भरत होते. पण विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन शेजारीच असलेली रमणबाग ही जागा संस्थेने १९१२ या वर्षी विकत घेतली व पहिली ते तिसरीच्या इयत्तांची सोय तेथे बांधलेल्या १६ वर्गात करण्यात आली त्यावेळच्या शिक्षणाधिकार्‍यांनी केलेली सूचना डेक्कन एज्युकेशन सोसायटीने मान्य केली आणि ३०.०६.१९४६ रोजी न्यू इंग्लीश स्कूल रमणबाग ही स्वतंत्र शाळा अस्तित्वात आली.

१२ जुलै १९६१ च्या पानशेतच्या महापुरात शाळेचे प्रचंड नुकसान झाले. पण पुराने उध्वस्त झालेले सर्व विभाग जिद्दीने पुन्हा निर्माण करून या संकटावर संस्थेने मात केली.