संपादन

प्रशालेचे विद्यार्थी सातत्याने गुणवत्ता यादीमध्ये विविध शिष्यवृत्त्या आणि क्रीडा स्पर्धांमध्ये झळकलेले आहेत. २००८ साली कुमार गौरव कुलकर्णी दहावीच्या शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत राज्यात पहिला लाला. कुमार आशय बुंदगले हा विद्यार्थी गणित ओलिन्पियाड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लोव्हानीया येथे ब्रांझ पदक विजेता ठरला. प्रशालेमध्ये संगणक प्रशिक्षणाची स्वतंत्र सोय असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत.