सोयी सुविधा
प्रशालेची इमारत १९५३ साली बांधण्यात आली. आणि तिचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या या भव्य इमारतीची रचना वैशिष्ट्य पूर्ण आहे. त्याच्या मध्यभागी गोलाकार घुमट असून त्यामध्ये आशियातील पहिले ' कुसुमबाई मोतीचंद प्लनेटोरियम (तारांगण)' स्थापित केले आहे. या घुमटाच्या तीन बाजूला मुख्य इमारतीची रचना करण्यात आलेली आहे. प्रशालेमध्ये आतून आणि बाहेरून वापरता येईल असा स्वतंत्र गणेश हॉल आहे. याशिवाय प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, क्रीडांगण अशा तर्हेच्या आवश्यक सुविधाही अद्ययावत स्वरुपात उपलब्ध आहेत.

