न्यू इंग्लीश स्कूल, पुणे

डेक्कन एजुकेशन सोसायटी संस्थापक विष्णुशास्त्री, लो. टिळक, गीपाल गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी १८८० स्थापन केलेली आद्य संस्था म्हणून या प्रशालेचे  संस्थेच्या इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे. एतदेशियांना आधुनिक शिक्षणाचे संस्कार घडवून त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम आणि आत्मनिर्भरता निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने या शाळेची स्थापना करण्यात आली. 'ज्ञान ही एक शक्ती आहे' ही नवी धारणा या स्थापणे मध्ये होती. त्यातून आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणीक व राजकीय जीवनाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी अत्यंत निग्रही कृतीने आणि आत्मविश्वासाने आणि त्यागाने या कार्यास आपले आयुष्य वाहून घेतले आणि संस्थेच्या अध्यापनचे व प्रशासनाचे काम सुरू केले. वर्षभरातच कुशाग्र बुद्धीचे वामन शिवराम आपटे संस्थेच्या कार्यात सामील झाले आणि त्यांचे बौध्दीक कर्तुत्व लक्षात घेऊन संस्थपाकानी त्यांना शाळेचे सुपरीटेन्डंट केले आणि खुद्द विष्णुशास्त्री चिपळूणकर हेड मास्टर म्हणून काम पाहू लागले. अगदी पहिल्याच वर्षी शाळेने केलेली प्रगती आश्चर्यकारक होती. १ जानेवारी १९८० रोजी पटावरील विद्दार्थ्यांची संख्या ३५ होती, ती ३१ डिसेंबर १८८० ला ३३६ झाली. त्यावर्षी मॅट्रिकच्या परीक्षेला पाठविलेल्या १२ विद्दार्थ्यांपैकी ८ उत्तीर्ण झाले अ त्यातल्या एकानंतर. 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती पटकावून शाळेच्या यशावर कळस चढविला. १८८५ साली विद्दार्थ्यांची संख्या हजारावर गेली आणि मॅट्रिक निकाल सातत्याने उत्तम लागत गेले. १८८० पासून ओळीने सात वर्षे शाळेला पहिली किंवा दुसरी 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली आणि १८८३ साली दोन्हीही जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्त्या मिळाल्या. प्रशाळेला आखिल भारतीय महत्व प्राप्त झाले. हंटर कमिशनपूढे वा. शि. आपटे यांना शैक्षणीक कैफियत मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात येणे हा शाळेचा सन्मान होता. श्री. आपटे यांची ही कैफियत शिक्षण विषयक भूमिका आणि धोरणांच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज म्हणून आजही ओळखली जाते. सुरवातीला न्यू इंग्लीश स्कूल मोरोबादादा वाड्यामध्ये भरत असे. नंतर ते नानावाड्या मध्ये हलविण्यात आले आणि पुढे मग या शालेतून न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग अशा द्वीधारा निर्माण झाल्या. मूळचे न्यू  इंग्लीश १९५३ साली टिळक रोडवरच्या भव्य वास्तूमध्ये स्थालांतरित झाले.